बसमध्ये महिलांच्या जागांवर बसल्यास पोलिस कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - पीएमपी बसमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुधवार (ता. २३) पासून पोलिस कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आरक्षित जागा प्रवासी महिलांनाच उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी संबंधित वाहक-चालकांचीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे सूतोवाच पीएमपीने मंगळवारी केले. बसमध्ये डावीकडील आसने महिलांसाठी आरक्षित आहेत; परंतु त्यावर अन्य प्रवासी बसतात, असे निदर्शनास येत आहे. त्यावरून प्रवासी महिला आणि वाहक-चालकांमध्ये वादही उद्‌भवत आहेत.

पुणे - पीएमपी बसमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुधवार (ता. २३) पासून पोलिस कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आरक्षित जागा प्रवासी महिलांनाच उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी संबंधित वाहक-चालकांचीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे सूतोवाच पीएमपीने मंगळवारी केले. बसमध्ये डावीकडील आसने महिलांसाठी आरक्षित आहेत; परंतु त्यावर अन्य प्रवासी बसतात, असे निदर्शनास येत आहे. त्यावरून प्रवासी महिला आणि वाहक-चालकांमध्ये वादही उद्‌भवत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा त्यांनाच उपलब्ध करून देण्यासाठी नियमावली तयार केली आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.

हेल्पलाइनवर करा तक्रार
महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरक्षित जागा त्यांना उपलब्ध न झाल्यास याबाबत प्रवाशांनी पीएमपीच्या हेल्पलाइनवर (दूरध्वनी क्रमांक ०२०-२४५४५४५४) संपर्क साधून तक्रार करावी. 

Web Title: PMP Bus women reserve seat crime