डिझेल दरवाढीने पीएमपीचे गणित कोलमडले

Diesel-Rate Increase
Diesel-Rate Increase

पुणे - डिझेलच्या दरामध्ये गेल्या चार महिन्यांत ६ रुपये २५ पैशांची वाढ झाली. त्यामुळे पीएमपीला महिन्याकाठी इंधनावर २० लाख रुपये जादा खर्च करावे लागत असल्याने पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात ७०० पेक्षा जास्त बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसेससाठी पीएमपीला सुमारे ३८ हजार लिटर डिझेल रोज खरेदी करावे लागते. ऑगस्ट महिन्यात ६८.७५ रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे डिझेल, पीएमपीला सध्या ७५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करावे लागत आहे. पीएमपी प्रशासनाला डिझेल हे सवलतीच्या दरात मिळत असले, तरी त्याच्या भावामध्ये १ मे २०१८ पासून सातत्याने वाढ झाली आहे. त्याचा फटका पीएमपी प्रशासनाच्या आर्थिक नियोजनाला बसत आहे. यातच सप्टेंबर महिन्यात तीन टप्प्यांत तब्बल ६ रुपये २५ पैशांनी इंधनाचे दर वाढल्याने पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

डिझेलच्या दरवाढीने पीएमपीला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे सर्व बस रस्त्यावर आणून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com