पुणे : कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न झालेल्या मार्गावर पुन्हा बस सुरू

pmp-bus
pmp-bus

पुणे : बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन, शनिपार-नीलज्योती (जनवाडी) मार्गावरील बस (मार्ग क्र. 59) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. बसच्या वाहकाला मारहाण करून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्यामुळे या मार्गावरील बस 18 फेब्रुवारीपासून बंद केली होती.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

नीलज्योती थांब्यावर बस उभी असताना, दुचाकीवरील दोन युवकांनी वाहक कैलास रणदिवे यांना मारहाण केली तसेच, रोकड पळवून नेण्याचाही प्रयत्न केला होता. बसमधील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रवाशांना धक्का बसला होता. या बाबत चतुःशृंगी पोलिसांनी दोन्ही युवकांना पकडले होते. मार्गावर बस वाहक-चालकांना लक्ष्य करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पीएमपीने 18 फेब्रुवारीपासून बस बंद केली होती. मात्र, बारावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बस वाहतूक पूर्ववत केल्याचे पीएमपीच्या स्वारगेट आगाराकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com