पीएमपीच्या आगार व्यवस्थापकांना टार्गेट; बसमागे दहा हजारांचे उत्पन्न मिळवा 

PMP depo managers Target get ten thousand earned by bus
PMP depo managers Target get ten thousand earned by bus

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व आगार व्यवस्थापकांना मार्गावरील बसच्या माध्यमातून दररोज किमान दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून द्यावे, असे टार्गेट दिले आहे. विशेष म्हणजे काही आगारांनी हे टार्गेट पूर्णही केले आहे. 

पीएमपीला आर्थिक बूस्ट मिळावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चालक- वाहकांना प्रोत्साहन भत्ता देणे, सणादिवशी जादा गाड्या उपलब्ध करणे, रातराणी, महिलांसाठी विशेष बस अशा अनेक सेवा सुरू केल्या आहेत. त्यातून पीएमपीची कमाई वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऑगस्टपासून सर्व आगारप्रमुखांना प्रतिबस दहा हजार रुपये कमविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. आगारातील वाहक, चालकांच्या कामाचे नियोजन, बसफेऱ्यांबाबत आढावा घेण्यात येत आहे. उत्पन्नवाढीसाठी ठेवलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाऱ्या व्यवस्थापकांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच, त्यांचे ध्येय का पूर्ण झाले नाही, याची माहिती घेण्यात येत आहे. एखाद्या मार्गावर पुरेसे उत्पन्न मिळत नसेल, तर नवीन मार्ग सुरू करणे गरजेचे आहे का, संबंधित आगारात पुरेसे मनुष्यबळ आहे का, यावर विचार करून पुढील महिन्याच्या नियोजनात बदल केले आहेत. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्यांना उत्पन्नाचा आकडा वाढवून दिला आहे. ते कमी पडत असेल, तर आगारप्रमुखांकडून त्यांच्या समस्या समजून घेण्यात येत आहेत, असे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांनी सांगितले. 

ऑगस्टमध्ये पावसाळा होता, त्यामुळे पहिल्या महिन्यात टार्गेट पूर्ण झाले नाही. मात्र, सप्टेंबरनंतर प्रत्येक महिन्यात किमान 80 टक्के ध्येय गाठले आहे, तर काही डेपो प्रतिबस 10 हजार रुपये उत्पन्न देण्यात यशस्वी झाले आहेत, असे गवळी यांनी सांगितले. 

ठरवलेले उद्दिष्ट गाठण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची आहे, त्यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले त्यांना पुढील टार्गेट दिले आहे. प्रत्येक महिन्यात परिस्थिती सुधारत आहे. 
- सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com