#PmpEbus ई-बस म्हणजे लक्ष्मीची पावलेच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

प्रवाशांची संख्या घटत असलेल्या ‘पीएमपी’ला वातानुकूलित ई-बसच्या रूपाने आशेचा किरण प्राप्त झाला आहे. साध्या बसच्या तुलनेत ई-बसचे प्रवासी २३ टक्‍क्‍यांनी जास्त आहेत. या बस जणू लक्ष्मीच्या पावलांनीच पीएमपीकडे दाखल झाल्या आहेत. 

पुणे- प्रवाशांची संख्या घटत असलेल्या ‘पीएमपी’ला वातानुकूलित ई-बसच्या रूपाने आशेचा किरण प्राप्त झाला आहे. साध्या बसच्या तुलनेत ई-बसचे प्रवासी २३ टक्‍क्‍यांनी जास्त आहेत. या बस जणू लक्ष्मीच्या पावलांनीच पीएमपीकडे दाखल झाल्या आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी)च्या ‘अर्बन मोबिलिटी ट्रान्स्फॉर्मेशन सर्व्हिसेस’ उपक्रमांतर्गत पीएमपीच्या पारंपरिक बस आणि नव्याने दाखल झालेल्या ई-बसच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यातून ही बाब समोर आली आहे. ‘आयटीडीपी’च्या श्रेया गडेपल्ली आणि अनुज ढोले यांनी हा अभ्यास केला आहे.

ई-बसमुळे इंधनाचा खर्च ६० टक्‍क्‍यांनी घटला आहे. ई-बसच्या सरासरी ९८ टक्के बस दररोज धावत असतात. त्या तुलनेत दैनंदिन कार्यान्वित असणाऱ्या साध्या बसची संख्या सरासरी ७५ टक्के असून, त्यातील १५ टक्के फेऱ्या विविध कारणांमुळे रद्द होतात. अचानक गाड्या बंद पडल्याने खर्च वाढत असून, पीएमपी तोट्यात जात आहे. 

लवकरच वाढणार चार्चिंग स्टेशन
‘सीएनजी’वर चालणाऱ्या बसपेक्षा ई-बसला प्रतिकिलोमीटर २५ टक्के अधिक उत्पन्न मिळत आहे. सध्या पीएमपीचे भेकराईनगर आणि निगडी डेपो येथे चार्जिंग स्टेशन आहे. त्या ठिकाणी अनुक्रमे ५२ आणि ३० चार्जिंग पॉइंट्‌स आहेत. सात नवीन चार्जिंग स्टेशन प्रस्तावित असून, त्या ठिकाणी ३४५ चार्जिंग पॉइंट्‌स असणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP E-bus

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: