पीएमपी कामगारांना कायम केल्याबद्‌ल पवारांचा सत्कार 

पीएमपी कामगारांना कायम केल्याबद्‌ल पवारांचा सत्कार 

पुणे - पीएमपीमध्ये 1400 कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्यामुळे संस्थेचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांचा हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. 

मार्केट यार्डात छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. आढाव म्हणाले, ""पीएमपीमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली, ही महत्त्वाची बाब आहे. कष्टकऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे चीज व्हावे, असे वाटत असते. कायम नियुक्तीचा त्यांना अवर्णनीय आनंद झाला आहे. याबाबत प्रशासनाचेही अभिनंदन करण्यासाठी मी पीएमपीमध्ये येऊन अध्यक्ष नयना गुंडे यांचाही सत्कार करणार आहे.'' 

पवार म्हणाले, ""कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आहे. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी दोन्ही महापालिकांच्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.'' नितीन जामगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com