पाच पर्यटन मार्गांवर पीएमपीच्या जादा बस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे - दिवाळी सुटीत पर्यटन क्षेत्रात प्रवाशांची गर्दी वाढते. ही बाब लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने सर्वाधिक प्रवासी असलेल्या पाच पर्यटन मार्गांवर 26 जादा बसचे नियोजन केले आहे. या बसच्या सुमारे 260 फेऱ्या होणार आहेत. 26 ते 29 ऑक्‍टोबर दरम्यान ही जादा बससेवा उपलब्ध असेल. 

स्वारगेट ते केतकावळे (मार्ग क्र. 293) (प्रतिबालाजी मंदिर) या मार्गावर दर 20 मिनिटांनी बस असेल, कात्रज ते स्वामी नारायण मंदिर (आंबेगाव) (मार्ग क्र. 295) या मार्गावर दर 25 मिनिटांनी, सासवड- एसटी स्थानक ते नारायणपूर (मार्गे भिवडी- मार्ग क्र. 207) मार्गावर दर 15 मिनिटांनी, शनिवारवाडा ते सिंहगड पायथा (मार्गे- स्वारगेट, धायरी - मार्ग क्र. 50) या मार्गावर दर 20 मिनिटांनी, तर पालिका भवन ते प्रतिशिर्डी (शिरगाव) (मार्गे- पुणे- मुंबई रस्ता, निगडी, सोमटणे फाटा- मार्ग क्र. 262) या मार्गावर दर 50 मिनिटांनी बस सुटेल. वर नमूद केलेल्या पाच मार्गांवर दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. त्यासाठी स्वारगेट, कात्रज, सासवड, शनिवारवाडा आणि पालिका भवन या बस स्थानकांवरून जादा बस धावतील. दर शनिवार आणि रविवारीही या मार्गांवरील बससेवा सुरू राहणार आहे, असे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP five tourist routes to the additional bus