पीएमपी, कचरा व्यवस्थापनावर भर - मुरलीधर मोहोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा सुधारताना, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले.

नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोहोळ यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील नेमक्‍या समस्या, त्या मार्गी लावण्याकरिता उपाययोजना, नियोजित प्रकल्प आदींची माहिती देत मोहोळ यांनी शहराचा समतोल विकास करण्याची ग्वाही दिली. 

ते म्हणाले, ‘‘शहरात रोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. मात्र, त्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी छोटे-मोठे प्रकल्प नव्याने उभारले जातील. त्यात, लोकसहभाग वाढविण्यावर भर राहणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यात, नव्या बसगाड्या रस्त्यांवर आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. शहराच्या विकास आराखड्याची (डीपी) प्रभावीपणे अंमलबजावणी करून नेमका विकास करण्याचा प्रयत्न करू.’’

‘‘चोवीस तास समान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांवरील स्थगिती मागे घेण्याबाबत राज्य सरकारबरोबर चर्चा करण्यात येईल.

योजनेतील टाक्‍या, नव्या जलवाहिन्या आणि मीटरची कामे एकत्रित केली जातील. त्यामुळे योजनेला गती येईल. मीटरने पाणीपुरवठा करण्याला प्राधान्य राहील. महापालिकेच्या अर्थसंकल्पातून सर्व प्रभागांसाठी समान आर्थिक तरतूद राहावी, याचा विचार होईल, असेही त्यांनी सांगितले. 
‘‘शहराचा विकास हा महत्त्वाचा घटक असून, स्थायी समितीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार करू. पुणेकरांच्या पैशांचा चोख हिशेब त्यांच्यासमोर ठेवला जाईल,’’ असेही ते म्हणाले.

Web Title: pmp garbage management