पीएमपीकडील ‘पुष्पक’ची सेवा पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - पीएमपीकडील ‘पुष्पक’ शववाहिनीची सेवा पूर्ववत झाली असून, या सेवेतील दोन वाहनांची दुरुस्ती केली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील त्यांचे परवाना नूतनीकरण झाले आहे. त्याच वेळी महापालिकेने तीन शववाहिन्या विकत घेतल्या असून, त्याची सेवा मोफत असावी की शुल्क आकारावे, याबाबत अद्याप धोरण निश्‍चित झाले नाही. 

अंत्यविधीसाठी महापालिकेने चोवीस वर्षांपूर्वी पीएमपीच्या माध्यमातून ‘पुष्पक’ ही शववाहिनीची सेवा सुरू केली होती. या सेवेत असलेल्या तीन वाहनांपैकी दोन बंद असल्याबाबत ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. पीएमपी प्रशासनाने ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत उर्वरित दोन वाहिन्यांची दुरुस्ती आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदणी करून त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

अग्निशामक दलाकडे पाच शववाहिनी असून, त्यांची सेवा प्रति ५ रुपये किलोमीटर दराने पुरविली जाते. महापालिकेने शववाहिन्यांची सेवा मोफत उपलब्ध करून दिल्यास दलाकडील शववाहिन्या कोणीच वापरणार नाही. 
-प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशमन दल

दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात शववाहिनी खरेदीसाठी एक कोटींची तरतूद केली होती. ही शववाहिनी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली होती. या तरतुदीनुसार महापालिकेने तीन टेम्पो ट्रॅव्हलर वाहने खरेदी केली असून, त्यांच्या रचनेत अत्यावश्‍यक बदल केले आहेत. ही वाहने अग्निशमन दलाकडे सुपूर्द केली आहेत. ही सेवा मोफत देण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून धोरण निश्‍चित केले जाणार होते. या शववाहिनीत पार्थिव आणि त्यासोबत १२ लोक बसू शकतील, अशी व्यवस्था केली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती. त्यानुसार ३ वाहने खरेदी केली. ही सेवा मोफत देण्यासाठी धोरण लवकरच ठरविले जाईल. 
- मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

Web Title: PMP Pushpak service is restored