लोहगाव विमानतळावरून पीएमपीची २० ऑक्‍टोबरपासून या पाच मार्गावर होणार वाहतूक सुरु

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

विमानातून येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या विविध भागात बसने प्रवास करण्यासाठी विमानतळ प्रशासनाचे संचालक कुलदीपसिंग यांनी पीएमपीच्या बससाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार २० ऑक्‍टोबरला सकाळी ७ वाजल्यापासून बससेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली. या बससाठी अंतरानुसार ५०, १०० आणि १५० रुपये भाडे आकारले जाणार आहे.

पुणे - लोहगाव विमानतळापासून पीएमपीची शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पाच मार्गांवर वाहतूक २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ई-बसचा वापर करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानातून येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या विविध भागात बसने प्रवास करण्यासाठी विमानतळ प्रशासनाचे संचालक कुलदीपसिंग यांनी पीएमपीच्या बससाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार २० ऑक्‍टोबरला सकाळी ७ वाजल्यापासून बससेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली. या बससाठी अंतरानुसार ५०, १०० आणि १५० रुपये भाडे आकारले जाणार आहे.

आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!

प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे विमानांच्या वेळापत्रकानुसार बसची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावर दररोज सध्या सुमारे ४० विमानांची उड्डाणे होतात तर, सुमारे ९ हजार प्रवाशांची ये-जा होते. प्रवासी संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्यानुसार बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. 

पुणे : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या!

विमानतळापासून या मार्गांवर बससेवा 

  • नगर रस्ता, चंदननगर, मगरपट्टा, हडपसर, 
  • कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, वाडिया कॉलेज, पुणे स्टेशन, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट 
  • पुणे स्टेशन, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाणेर, वाकड, हिंजवडी 
  • विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, भोसरी, नाशिक फाटा, पिंपरी

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP transport from lohegaon airport start on five routes from October 20