पीएमपीच्या कामगारांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पीएमपीचे उत्पन्न वाढवा 
दिवाळीच्या काळात कामगारांनी सुट्या न घेता पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी भर द्यावा, कामावर वेळेवर येऊन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पीएमटी कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी केले आहे. 

पुणे - पीएमपीमधील कामगारांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 14 हजार रुपये बक्षिसाची रक्कम बुधवारी त्यांच्या खात्यात प्रशासनाने जमा केली. पीएमपीच्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे 11 हजार  कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. 

याबाबत पीएमटी कामगार संघाने (इंटक) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघटनेने यापूर्वी औद्योगिक आणि उच्च न्यायालयाचा आणलेला निर्णय कामी आला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्‍य झाले आहे. 

या बाबत पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी बोनस आणि बक्षिसाच्या रकमेसाठी वारंवार आंदोलने करावी लागत; परंतु नयना गुंडे यांनी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून कामगारांना बोनसची रक्कम वेळेवर मिळत आहे. संघटनेतर्फे गुंडे तसेच सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांचे बुधवारी अभिनंदन करण्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले. 

पीएमपीचे उत्पन्न वाढवा 
दिवाळीच्या काळात कामगारांनी सुट्या न घेता पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी भर द्यावा, कामावर वेळेवर येऊन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पीएमटी कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP workers 8.33 percent subsidy