#PMPIssue रक्षाबंधनला पीएमपी ‘रिव्हर्स’

#PMPIssue रक्षाबंधनला पीएमपी ‘रिव्हर्स’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - रक्षाबंधनाचा दिवस पीएमपीसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा दिवस असतो. त्यामुळे पीएमपीने  जादा ८८ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र रविवारी शहरात दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३१ लाखांची घट झाली 
आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे; पण रविवारी शहराच्या अनेक भागांत दिवसभर पाऊस पडत होता. या पावसाचा पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. 

या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला १ कोटी ६६ लाख ६ हजार ७४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये १ कोटी ६० लाख १७ हजार रुपये तिकिटातून, पासच्या माध्यमातून ५ लाख ८३ हजार ५७५ आणि आराम बसच्या माध्यमातून ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी १ कोटी ९७ लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न  मिळाले होते.

रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला विक्रमी उत्पन्न मिळत असते. हा मागील काही वर्षांचा अनुभव आहे. मात्र या वर्षी हा सण रविवारी आल्याने आणि त्यातच शहरात दिवसभर पाऊस असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला.
- सुभाष गायकवाड,  प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

Web Title: PMPIssue PMP Raksha Bandhan target no complete