Pune News : पीएमपी बसचालकास मारहाण, परस्परविरोधी तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML bus driver assaulted complaint filed Case against four including former corporator Pratibha Dhamale pune

Pune News : पीएमपी बसचालकास मारहाण, परस्परविरोधी तक्रार दाखल

पुणे : पीएमपी बसचा मोटारीला धक्का लागल्यामुळे बसचालकास मारहाण केल्याची घटना टिळक रस्त्यावरील पूरम चौकात घडली. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले यांच्यासह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, ढमाले यांनी फिर्याद दिल्यावरून पीएमपी चालकाविरुद्ध मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात स्वारगेट पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्राप्त झाल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपी बसचालक शशांक यादवराव देशमाने (वय ५२, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक देशमाने हे बुधवारी शिवाजीनगरच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होते.

पूरम चौकात अचानक सिग्नल लागल्याने बसचा मोटारीला पाठीमागून धक्का लागला. त्यामुळे मोटारीतील चालक आणि इतरांनी देशमाने यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जखमी केले. याबाबत प्रतिभा ढमाले, मुकेश पायगुडे, महेश भरगुडे आणि ढमाले यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तसेच, प्रतिभा नितीन ढमाले (वय ५४, रा. घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएमपी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवून मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारचालक महेश भरगुडे यांनी त्याचा जाब विचारल्यानंतर बसचालकाने त्यांना मारहाण केली. तसेच, मुकेश वसंत पायगुडे यांनाही मारहाण करून फिर्यादीला धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली.

टॅग्स :policecrimePMPML Bus