Pune Rains : मदतीस गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

''मी सर्व अपडेट घेतल्या आहेत. घटनास्थळी पोलिस प्रशासन व अग्निशमन दल आलेले आहे. मदतीचे काम सुरू असून, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी उद्या संपर्क साधणार आहे''.

- नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएमल  

स्वारगेट (पुणे) : जो दिवसभर मदतीचा ध्यास घेऊन बंद पडलेल्या गाड्यांना ओढून नेण्याचे काम करीत होता, त्याच्यावरच बुधवारी (ता.9) काळाने झडप घातली. सायंकाळच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसात एक 10-12 टनाचे झाड रस्त्याने जाणाऱ्या पीएमपीवर पडले आणि त्यातच या ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला. या पीएमपी बसवर झाड पडल्यानंतर सुमारे दोन तास बसचालक अडकून पडलेला होता. आयुष्यभर ज्या पीएमपी बसमध्ये त्याने काम केले, प्रवास केला त्याच पीएमपीमध्ये शेवटचा श्वाससुद्धा त्याने घेतला. 

बंडू नवगुणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नवगुणे हे ब्रेक फेल झालेल्या, रस्त्यावर बंद पडलेल्या पीएमपीच्या बसगाड्या ओढून नेण्याचे काम करत. यावेळीही ते टिळक रस्त्यावरून सहकारनगरकडे निघाले होते. एस. पी. कॉलेजपासून वळण घेत असताना नेमके त्याचवेळी एस पी कॉलेजजवळील पिंपळाचे झाड त्या पीएमपीवर पडले. या बसमध्ये तीन कर्मचारी होते. त्यातील दोघांना बसमधून बाहेर पडण्यात यश आले. मात्र, बंडू नवगुणे हे गाडी चालवत होते. त्यामुळे त्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune Rain : मुसळधार पावसामुळे कर्वे रस्त्याला नदीचे स्वरूप

''मी सर्व अपडेट घेतल्या आहेत. घटनास्थळी पोलिस प्रशासन व अग्निशमन दल आलेले आहे. मदतीचे काम सुरू असून, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी उद्या संपर्क साधणार आहे''.

- नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएमल  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML Bus Driver Died after Tree Collapsed on Bus