आरोग्य तपासणीमुळे कर्मचारी जागरूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, अपोलो स्पेक्‍ट्रा हॉस्पिटल व अनुबंध हेल्थ केअर यांच्यावतीने ‘पीएमपीएमएल’च्या हडपसर डेपो आगारात बसचालक व वाहक यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांची कर्करोग व नेत्र तपासणीद्वारे तपासणी करण्यात आली. 

शिबिराच्या माध्यमातून चालक व वाहक यांची मोफत रक्तदाब, वजन -उंची , शुगर, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मुख - आरोग्य व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तंबाखूचे व्यसन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख तपासणीदरम्यान व्यसन बंद करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्याचबरोबर अनेक वर्षे चष्म्याचा नंबर न बदललेल्या कर्मचाऱ्यांना तपासणीमुळे नवीन नंबर मिळाला. 

या प्राथमिक तपासण्यांमुळे आरोग्याविषयीच्या अनेक प्रश्‍नांची उकल त्यांना झाली व कामाच्या गडबडीतून वेळ काढून आरोग्य तपासणी करून घेतल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. पुढील उपचारांसाठी मोफत कूपन देण्यात आले.  या वेळी हडपसर डेपोचे व्यवस्थापक सतीश गाटे, मंदार पवार, अपोलो हॉस्पिटलचे मनोज साठे व अनुबंध हेल्थ केअरचे डॉ. रणजित निंबाळकर उपस्थित होते.

Web Title: PMPML Employee Health Cheaking