महिलांसाठी पीएमपीचा एक दिवस नाही तर वर्षभर मोफत प्रवास द्या; जयश्री ढिंबले

आम आदमी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवली
PMPML free travel for women year Aam Aadmi Party pune
PMPML free travel for women year Aam Aadmi Party pune Sakal

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला महिलांसाठी तेजस्विनी बसचा प्रवास मोफत असणार असल्याचे जाहीर केले. पण यावर आम आदमी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शहरात १० मार्गांवर केवळ ३० तेजस्विनी बस धावत आहेत. त्यामुळे महिलांना त्याचा लाभच मिळणार नाही. केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्यापेक्षा वर्षभर सर्व प्रकारच्या पीएमपी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

पीएमपीने महिलांनी प्रवास करावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला मोफत प्रवास योजना सुरू केली. ही योजना २०१८ मध्येच जाहीर केली होती, पण उशिरा का होईना ही सुरू झाली. याचे आम्ही स्वागत करतो, पण ही योजना अर्धवट आहे. महापालिकेच्या ताफ्यात सुमारे १५०० बस आहेत, त्यापैकी केवळ १० मार्गावर ३० बस या मोफत प्रवासासाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे याचा फायदा शहराच्या सर्व भागातील महिलांना होणार नाही. यातून महिलांचा काहीच फायदा नाही, केवळ तोंडाला पाणी पुसल्या सारखे आहे, अशी टीका आपच्या लीगल सेलच्या मंजूषा नयन यांन केली.

जयश्री ढिंबले म्हणाल्या, एक दिवस मोफत बस देऊन पीएमपीने उपकार केले नाहीत. खरच महिलांची काळजी असेल तरी वर्षाचे सर्व दिवस व सर्व मार्गांवर बससेवा मोफत दिली पाहिजे. ज्योती ताकवले म्हणाल्या, महिलांसाठी मोफत बस सेवा दिल्यास त्याचा फायदा थेट कष्टकरी महिला, नोकरदार महिलांना होणार आहे. वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल. दिल्लीमध्ये आप सरकारने महिलांसाठी मोफत बससेवा केल्याचा फायदा झाला आहे. यावेळी आपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com