‘पीएमआरडीए’ उभारणार मेट्रोचे जाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आठ मार्गांचा प्रस्ताव; लवकरच दिल्ली मेट्रोकडून अहवाल तयार करणार

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरपाठोपाठ पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या आठ मार्गांवर हा प्रकल्प राबविता येईल का नाही, यांची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो या कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

जागतिक निविदा मागविल्या
मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महापालिकेच्या पाठीमागून आलेल्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बाजी मारली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा तेवीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने मध्यंतरी मान्यता दिली. त्यापाठोपाठ पीएमआरडीएने या कामासाठी जागतिक (ग्लोबल) निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीचे आणखी एक पाऊल पुढे पडले.

पूर्वसुसाध्यता तपासणीनंतर मार्ग निश्‍चित
या मार्गापाठोपाठ पीएमआरडीने शहरातील आणखी आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे मार्ग निवडण्यात आले आहेत. या मार्गांची पूर्वसुसाध्यता तपासणी करून त्यानंतर मार्ग निश्‍चित केले जाणार आहेत. याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहेत.

अहवाल मिळताच ‘डीपीआर’चे काम
मेट्रो मार्ग निवडताना पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडले जाणार आहेत.

याशिवाय, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक असे हे मार्ग असतील. ज्यामुळे शहरात मेट्रोचे जाळे उभे राहण्यास मदत होईल. येत्या वर्षभरात या मार्गांचा अहवाल प्राप्त होईल आणि डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmrda metro nest