ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या एक इमारत असलेले गृहप्रकल्प आणि औद्योगिक बांधकामांना बुधवारपासून (ता. २७) परवानगी देण्यास सुरवात करण्यात येणार आहे.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या एक इमारत असलेले गृहप्रकल्प आणि औद्योगिक बांधकामांना बुधवारपासून (ता. २७) परवानगी देण्यास सुरवात करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगीसाठी मदत कक्ष सुरू केला आहे. त्याचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते करण्यात आले. महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अनधिकृत बांधकाम नियंत्रक प्रमुख सारंग आव्हाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, प्रशासन अधिकारी अर्चना तांबे, क्रेडाईचे डी. के. अभ्यंकर आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत बांधकाम परवानगी प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने उपस्थित विकसक, सर्वेक्षक व वास्तुविशारदांना समजावून सांगण्यात आली. बांधकाम परवानगी नकाशे व बॅंक चलन हे डिजिटल स्वाक्षऱ्या करून प्रदान करण्यात येतील व इतर माहिती ई-मेल आणि मोबाईलवर दिली जाईल. या प्रणालीमध्ये ‘कलर-कोडिंग स्कीम’चा वापर केला गेला आहे. त्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे होणार आहे. सर्व चलन ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधाही यात आहे. प्राधिकरणाच्या अस्तित्वात असलेल्या जमीन वापर प्रणालीशी या नवीन बांधकाम परवानगी प्रणालीला जोडण्यात आले आहे. 

पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ‘‘पीएमआरडीए कार्यालयात संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीसाठी मदत कक्ष उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ आहे. या संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरिता ’www.pmrda-obpas.com’ हे पोर्टल विकसित केले आहे. नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयात माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांना २०२-२५९३३३०० या क्रमांकावर माहिती मिळणार आहे. 

Web Title: PMRDA The online construction permission system starts