विकासकामांवरून झाले पीएमआरडीएचे ट्‌विट ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

ट्रोल केलेल्या पोस्ट 

  • मेट्रोसाठी जागा भाडेतत्त्वावर हवी
  • झोन दाखला ऑनलाइन
  • टीपी स्कीमसाठी नवे दहा प्रस्ताव
  • लॅंड पुलिंग योजना
  • मांजरी बुद्रूक १८ मीटर आरपी रस्ता
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे
  • मागेल त्याला टीपी स्कीम
  • पीएमआरडीए व स्विर्त्झलॅंड करार २००० वॅट स्मार्ट सिटी
  • पीएमआरडीए आयटी रोड मॅप

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नुकतेच ट्‌विटर अकाऊंट सुरू केले आहे. विविध विकासकामांची माहिती ट्‌विटरवर टाकली जाते. मात्र, युजरनी पीएमआरडीएच्या प्रत्येक ट्‌विटला चांगलेच ट्रोल केले आहे. विकास कामांच्या धिम्या गतीवरुन व प्रलंबित विकासकामांवरुन नागरिकांनी पीएमआरडीएला जाब विचारून धारेवर धरले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पीएमआरडीएने मंगळवारी (ता. ३) ऑनलाइन झोन दाखल्याला प्रतिसाद मिळत असल्याचे ट्‌विट केले. ऑनलाइन ७४५ दाखले नागरिकांना मिळाले आहेत. युजरने इतर विकासकामांचे दाखले पीएमआरडीएकडे मागितले. प्रलंबित विकासकामांचा आढावा विचारला असून वाघोलीतील बांधकाम परवानगी बंद करण्याची आग्रही मागणी केली. तसेच वाढीव बांधकामांचा जाबही विचारला आहे. त्याचप्रमाणे पीएमआरडीए हद्दीत मोठ्या टाऊनशिपची उभारत आहे. मात्र, सुस्थितीतील रस्त्यांची मूलभूत सुविधा अगोदर नागरिकांना द्या, यावरून बऱ्याच युजरने ट्रोल केले आहे. 

प्रश्‍नांमध्ये अनधिकृत बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला कसा दिला जातो, महाळुंगे-माण हाय टेक सिटीचे काम कोणत्या टप्प्यात आहे, पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या भोगवटा प्रमाणपत्राची माहिती अद्याप मिळाली नाही, विकास आराखड्याचे काम कधी पूर्ण होणार, पायाभूत सुविधा, ॲमेनिटी स्पेस व रस्त्यांची रेंगाळलेल्या कामांची डेडलाईन केव्हा संपली, प्रत्येक सहा महिन्यांतून सरकारकडे एक तरी नवीन प्रस्ताव दिले जातात. मान्यताही मिळते. मात्र, विकासकामे किती प्रमाणात होत आहेत, अस्तित्वात असलेले किती रस्ते आतापर्यंत दुरुस्त केले आहेत, ‘मेट्रो आणि हायपरलूपची स्वप्न नागरिकांना नंतर दाखवा’ आधी पायाभूत सुविधा नागरिकांना द्या, अशी मागणी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmrda tweet troll on development work