‘पीएमआरडीए’चे संकेतस्थळ दुर्लक्षितच

PMRDA
PMRDA

पिंपरी - पीएमआरडीएला तीन वर्ष उलटून गेली. मात्र, संकेतस्थळाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे संकेतस्थळ पीएमआरडीएने अद्याप अद्ययावत केलेले नाही.

निविदा प्रक्रिया, विभागांच्या कामकाजाची माहिती, प्रकल्पांची माहिती, ऑनलाइन परवाना, बांधकाम परवानगी, झोन दाखला अशा विविध कामांसाठी संकेतस्थळ उपयोगी पडते. मात्र, ते अद्ययावत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम प्रशासनाकडे नाही. संकेतस्थळावर पुरेशी माहिती नसल्याने नागरिकांना थेट औंध व आकुर्डी कार्यालयात यावे लागते. या संकेतस्थळाचे कामकाज कंत्राटी पद्धतीने एका खासगी कंपनीला दिले आहे. 

भाषा अवघड
या संकेतस्थळावरील भाषा अवघड आहे. कंपनीने इंग्रजीचे मराठी भाषांतर जसेच्या तसे केले आहे. त्यामुळे ते समजणे अवघड जाते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याचे काम केले गेले नाही. 

सोशल मीडियालाही घरघर 
कित्येक दिवसांपासून पीएमआरडीएचे ट्विटर अकाउंट बंद होते. ते नुकतेच सुरू झाले आहे. यापूर्वी ते तत्कालीन आयुक्त किरण गित्ते हे हाताळत होते. फेसबुक अकाउंटही सध्या वापरात नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काहीही माहिती मिळत नाही. 

‘‘पीएमआरडीए’च्या फेसबुकवर अनेकदा सुविधांबाबत माहिती मागितली. मात्र, उत्तर मिळाले नाही. संकेतस्थळावर पुरेशी माहिती नाही. कोणत्या कामासाठी कोणता क्रमांक याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे दूरवरुन कार्यालयात येऊन माहिती घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते,’’ असे एका फेसबुक तक्रारदाराने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com