पीएनजी ज्वेलर्सची दोन नवीन दालने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरात आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करीत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रॅंड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे. उंड्री येथील स्टोअरचे उद्‌घाटन बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिच्या हस्ते, तर मंचर येथील स्टोअरचे उद्‌घाटन अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले.

पुणे - शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरात आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करीत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रॅंड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे. उंड्री येथील स्टोअरचे उद्‌घाटन बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिच्या हस्ते, तर मंचर येथील स्टोअरचे उद्‌घाटन अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. या दोन्ही दालनांसह पीएनजी ज्वेलर्सची आता ३७ दालने आहेत. या दोन्ही नवीन स्टोअर्समध्ये पीएनजी ज्वेलर्सचे खास सिग्नेचर सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 

उंड्रीमधील स्टोअर सर्व्हे नं. १२, शॉप नं. ५, ॲक्‍सिस बॅंकेजवळ, गगन अरेना, कडनगर, उंड्री येथे सुरू करण्यात आले आहे. 

मंचरमधील स्टोअर शॉप नं. ३, समृद्धी कॉम्प्लेक्‍स, गुजराथी हॉस्पिटलसमोर, पुणे-नाशिक हायवे, मंचर येथे सुरू करण्यात आले आहे.

या दोन्ही नवीन स्टोअर्सबाबत गाडगीळ म्हणाले, ‘‘पुण्याचा विस्तार चहूबाजूने होत असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांवरून उपनगरांमधील अंतर वाढत चालले आहे. त्यामुळेच ग्राहकांनी प्रवास करून मध्यवर्ती ठिकाणी येण्यापेक्षा जिथे ग्राहक आहेत, तिथेच आम्ही विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत उंड्री व मंचरचा समावेश होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PNG Jewellers two new shops open