घर बसल्या बसल्या : कविता, नाटक अन्‌ संगीत

संगीताचे ऑनलाइन धडे देताना गोविंद कुलकर्णी.
संगीताचे ऑनलाइन धडे देताना गोविंद कुलकर्णी.

कवितेचा व्हिडिओ
लॉकडाऊनच्या काळात घरात बसून करायचे काय, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. मात्र यामुळे अनेकांच्या सर्जनशीलतेलाही पालवी फुटली आहे. कुणी घरात बसून संगीतात नवे प्रयोग करीत आहेत, कुणी गाणे रेकॉर्ड करून समाजमाध्यमातून टाकत आहेत. पुण्यातील दिग्विजय जोशी यांनी ‘मोकळ्या मोकळ्या आभाळाशी’ कविता लिहून त्याचे छायाचित्रण केले आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. दिग्विजय यांनी यापूर्वी चित्रपटांसाठी पार्श्‍वगायन केले आहे. ते म्हणाले, ‘‘घरात बसू काय करायचे असा प्रश्‍न पडला असतानाच मला कविता सुचली. माझ्या एका मित्राला, अभिजित यादव याला ती पाठविली, त्याने चाल लावून मला पाठविली. त्याला अनुषंगिक छायाचित्रण माझी पत्नी समा हिने केले. त्यांचे मोबाइलवरच संकलन मी केले आणि त्याला कवितेची पार्श्‍वभूमी दिली आहे.’’

थिएटर इन टाइम ऑफ कोरोना 
कोरोनाने प्रत्येकाची चिंता वाढविली खरी; पण काहीजण त्यातूनही काही चांगले शोधण्याचा प्रयत्न करतात. दिग्दर्शक अतुल पेठे हे प्रयोगशील नाट्यकर्मी. घरात बसून त्यांनी त्रिनाट्यशृंखला तयार केली आहे. नाटकाचा अवधी दोन तास, एकांकिकेचा अवधी पाऊण ते एकतास असतो. परंतु त्यांनी एक मिनिटाचे नाट्य तयार केले. या तीन नाट्याच्या शृंखलेतून एक वेगळा नाट्यानुभव दिला आहे. पहिला ‘स...स...स...स...’ दुसरा ‘सत्य’ आणि तिसरा ‘सोललो’ असे हे व्हिडिओ आहेत. ते एकत्रित करून त्यांनी यूट्यूबवर अपलोड केले आहेत. थिएटर इन टाइम ऑफ कोरोना असे या प्रयोगाला नाव दिले आहे. अभिनय स्वत: पेठे यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका हाती कॅमेरा पकडून त्यांनी छायाचित्रणही केले आहे. त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी प्रकाशयोजना केली आहे. 

घरातूनच संगीताचे धडे
विकेंडला संगीतचा क्‍लास भरायचा, पण लॉकडाऊनमुळे सगळेच बंद पडले. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील विद्यार्थाला ऑनलाइन संगीताचे धडे देत होतो, आता पुण्यातील विद्यार्थीही ऑनलाइनच्या माध्यमातून जोडले गेले. सध्या सकाळी आणि दुपारी प्रत्येकी तीन तास व रात्री एक तास संगीताचा क्‍लास सुरू आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे, अशी माहिती संगीत शिक्षक गोविंद कुलकर्णी यांनी दिली. संगीताचे ज्ञान असलेल्या गायकांमध्ये राग गायनाची पद्धत, मुलांना शास्त्रीय संगीत का शिकवावे यावर चर्चा होते. यामध्ये ऑनलाइन सहभागी होऊन मत व्यक्त करतो. त्यामुळे माहितीचे आदानप्रदान होते, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com