विषारी घोणस सापाची खोल विहीरीतून सुटका, निरगुडे येथील घटना

junnar
junnar

जुन्नर -  निरगुडे ता.जुन्नर येथील सतिश जेजुरकर यांच्या विहिरीत पडलेल्या विषारी घोणस सापाची सुटका करण्यात आली आहे. जेजुरकर यांची जागरूकता, माजी सैनिक वनरक्षक रमेश खरमाळे व सर्पमित्र आकाश परदेशी यांच्या प्रयत्नामुळे सुमारे पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या सापास जीवदान मिळाले आहे.ही घटना सोमवारी ता.12 रोजी सांयकाळी घडली. 

जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे सो. यांना माहिती देऊन एक वन्यजीव वाचवून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडावे म्हणून खरमाळे जेजुरकरांच्या घरी सांयकाळी पोचले. 

सोबत विहिरीत उतरण्याचे सर्व साहित्य घेतले होते. जेजुरकर यांच्या मळ्यातील विहिरीवर पोहोचलो. जवळपास पन्नास फूट खोल विहीरीत हा विषारी घोणस  सुगरण पक्षांच्या घरट्यातील अंडी खाण्याच्या नादात पडला असल्याचे लक्षात आले. शेजारी दोन विहिरी असल्याने साप  बाहेर कसा काढावा काही समजेना. घोणस अत्यंत विषारी असल्याने मदतीसाठी सर्पमित्र  आकाश परदेशी यांना घेतले. रोप, बेल्ट सर्वकाही सोबत होते आकाशला विहिरीत उतरण्या बाबत मार्गदर्शन केले. जीव धोक्यात घालत परंतू सर्वतोपरी काळजी घेत आमचा रेस्क्यू सुरू झाला. जबाबदारीचे रोप होल्डींग कंट्रोल माझ्याकडे ठेवला होता. रोपद्वारे आकाशला खाली सोडण्यात आले. एक कॅरेट बांबूला बांधले होते. ते आकाशकडे खाली सोडले. खोल विहीरीत हा रेस्क्यूसाठी गावकरी मदतीला धावुन आले. सर्प कॅरेट मध्ये येताच आकाशला आम्ही सर्वांनी वर ओढले.  रेस्क्यू पूर्ण करताच घोणस या विषारी प्रजातीच्या सर्पास त्याच्या अधिवासात सोडून दिले. वनक्षेत्रपाल  प्रज्योत पालवे यांना रेस्क्यूची माहिती दिली. 

माजी सैनिक वनरक्षक रमेश खरमाळे,जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता  बदलताना पाहून खूप आनंद होतोय. हळूहळू येथील  वन्य प्राण्यांशी आपले स्वत:चे नाते जोडण्याचा मानव  प्रयत्न करतोय याचा खरोखरच अभिमान वाटतो. कारण गेली अनेक दिवस सर्प, बिबट्या, पक्षी यांना वाचवण्यासाठी येथील ग्रामस्थ पुढे सरसावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याने येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितच ही जागरूकता अनेक ठिकाणी पाहावयास मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com