पोलिसांची अमीरबरोबर ‘सेल्फी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - वेळ शुक्रवारी सकाळी साडे अकराची... पोलिस आयुक्तालयाच्या आवारात अचानक एकच गलका झाला... ‘अरे तो आला’, ‘मला त्याच्याबरोबर सेल्फी काढायचीयं’ असे म्हणत खाकी वर्दीतील चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. होय, ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अमीर खानबरोबर एक सेल्फी घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती आणि त्यानेही मोठ्या दिलानं प्रत्येकाबरोबर छायाचित्र व सेल्फीसाठी पोझ देत त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी हास्य फुलविलं! 

अमीर खानच्या संस्थेतर्फे रविवारी पुण्यात एक कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त तो शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात आला होता. तो गाडीतून उतरल्यानंतर सगळ्यांचेच डोळे त्याच्याकडे वळले. त्याबरोबर सेल्फी, छायाचित्र घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. आमीरनेही खाकी वर्दीतील आपल्या चाहत्यांना मनसोक्तपणे छायाचित्रे काढण्यासाठी पोज दिली.

‘‘मागील वर्षी कार्यक्रमाच्या वेळी अमीर खानला सुरक्षेबाबतचा वेगळा अनुभव आला होता. या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमाच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यासाठी तो आयुक्तालयात आला होता,’’ असे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

Web Title: Police Aamir Khan Selfie