72 हजार वाहनचालकांना "ब्रेक' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

9 मे ते 12 ऑगस्ट या कालावधीत सर्व पोलिस ठाण्याचे तपास पथक व गुन्हे शाखेच्या युनिटने 83 हजार 948 वाहने तपासली. यापैकी 72 हजार 582 वाहनचालकांवर कारवाई केली. 

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील अँटी गुंडा स्कॉडने तीन महिन्यांत 72 हजार 582 वाहनचालकांवर कारवाई केली. 
सायंकाळच्या वेळी रस्त्यांवर टवाळखोरी करून नागरिकांना त्रास देणाऱ्या हुल्लडबाजांसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी रोज सायंकाळी सात ते बारा या वेळेत कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार 9 मे ते 12 ऑगस्ट या कालावधीत सर्व पोलिस ठाण्याचे तपास पथक व गुन्हे शाखेच्या युनिटने 83 हजार 948 वाहने तपासली. यापैकी 72 हजार 582 वाहनचालकांवर कारवाई केली. 

 • ट्रिपल सीट : 10 हजार 467 
 • हेल्मेट नाही : 3 हजार 143 
 • वाहन चालविताना मोबाईलचा वापर : 4 हजार 613 
 • विनापरवाना वाहन चालविणे : 38 हजार 465 
 • फॅन्सी नंबरप्लेट : 2 हजार 508 
 • नंबर प्लेट नसलेली वाहने : 2 हजार 508 
 • रॅश ड्रायव्हिंग - 491 

 

 1. मुंपोऍ 110, 112, 117 प्रमाणे कारवाई : 3 हजार 245 
 2. भादवि कलम 279 अन्वये : 169 
 3. मुंपोऍ 102 प्रमाणे : 261 
 4. मुंपोऍ 207 अन्वये : 34 
 5. इतर वाहतूक : 4 हजार 706 
 6. मुंपोऍ 68/69 प्रमाणे : 1 हजार 943 
 7. बीपी ऍक्‍ट 142 प्रमाणे : 26 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action against vehicle