पुणे शहरातील दोन कुंठणखाने सील; पोलिसांची कारवाई 

पुणे शहरातील दोन कुंठणखाने सील; पोलिसांची कारवाई 

पुणे ः अल्पवयीन मुली व सज्ञान तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करुन घेतल्या जात असलेले शहरातील दोन कुंठणखाना बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत. कारवाई करण्यात आलेले कुंटणखाने फरासखाना व स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.

शहरात लागोपाठ घडलेल्या खुनाच्या घटना, मध्यवर्ती भागात गुन्हेगारांचा वाढता वावर याच्यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे मागील काही दिवसात घडले. विशेषतः मध्यवर्ती भागात शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक मारटकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत टिका सुरू होती. या सर्व घटनांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्याचबरोबर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही कडक कारवाई करण्यास सांगितले होते. 

या पार्श्‍वभुमीवर शहरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायाच्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. त्यामध्ये स्वारगेट परिसरातील आयुर्वेद पंचकर्म बॉडी ट्रिटमेंट सेंटरवर कारवाई करण्यात आली. संबंधीत सेंटर बंद करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलिसांनी पाठविला होता. तसेच बुधवार पेठेतील जुनी सागर बिल्डींग येथे वेश्‍या व्यवसाय सुरू असल्यामुळे तेथेही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. दोन्ही कुंटनखाने बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिले. 

फिरोज खान "एमपीडीए' अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध 
समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या फिरोज उर्फ बबाली मकबुल खान (वय 48, रा. आयना मस्जिद समोर, ए.डी.कॅम्प, भवानी पेठ) याच्या नावावर विविध प्रकारचे आठ गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामध्ये धारदार शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दुखापत, दंगा, वाहनांची तोडफोड, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला या गुन्ह्यांचा समावेश होता. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्याच्याकडून गुन्हे सुरू होते. या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) त्याच्यावर कारवाई करुन त्यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी दिला होता. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी संबंधीत प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर त्यास कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com