वालचंदनगरमध्ये रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा... 

राजकुमार थोरात 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वालचंदनगर परीसरामध्ये शैक्षणिक हब म्हणून आेळखला जातो. येथे सुमारे पाच हजार मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळा  सुरु व सुटण्याच्या वेळी अनेक रोडरोमिओ बसस्थानकाच्या परीसरामध्ये चकरा मारत असल्याचा प्रकार घडत होते

वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील जुन्या बसस्थानकावर वालचंदनगर पोलिसांनी रोडरोमिओवरती कारवाईचा बडगा उगारुन पंधरा जणांवर कारवाई केली.

वालचंदनगर परीसरामध्ये शैक्षणिक हब म्हणून आेळखला जातो. येथे सुमारे पाच हजार मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळा  सुरु व सुटण्याच्या वेळी अनेक रोडरोमिओ बसस्थानकाच्या परीसरामध्ये चकरा मारत असल्याचा प्रकार घडत होते. वालचंदनगर पोलिसांनी आजपासुन बसस्थानकाच्या परीसरामध्ये रोडरोमिओवरती कारवाई करण्याची मोहिम राबवली. आज सुमारे वाहनपरवाना नसताना दुचाकी चालवणे, दोन पेक्षा जास्त व्यक्ती बसवून दुचाकी चालवणाऱ्या व इतर १५ जणावर कारवाई केली. यामध्ये वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे, साहय्यक फौजदार संदीपान वीर, हवालदार मोहन फाळके, गणेश काटकर, रुपेश नावडकर, माधुरी लडकत, प्रकाश पेडकर यांनी सहभाग घेतला.

 

Web Title: Police Action on Road Romeos in Valchandnagar Pune