आगीतून फुफाट्यात पडल्यागत झाली अवस्था; 'त्यांनी' परवानगी दिली, पण सोसायटी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची परवानगीची अट घालण्यात आली.

पुणे : लग्नासाठी सहकुटुंब लातूरला गेले होते... अचानक लॉकडाऊन सुरू झाला. गेली तीन महिने तेथेच अडकून पडले... आता कुठे पुण्याला येण्यासाठी परवानगी मिळाली... तर सोसायटीने प्रवेश बंदी केली. पोलिस परवानगी, कोरोनाची तपासणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र असून देखील सोसायटी मात्र ऐकण्यास तयार नाही...काय करावे? असा प्रश्‍न त्या कुटुंबापुढे उभा राहिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे पुण्याबाहेर अनेकजण अडकून पडले होते. आता पोलिस आणि प्रशासनाकडून कशीबशी परवानगी मिळाली, तर सोसायटीने प्रवेश बंदी केली आहे. सोसायटीधारकांच्या या आडमुठेपणामुळे अनेकांना सध्या अशा प्रकाराचा त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. 

- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू केला. परंतु लॉकडाऊन आधी लग्नासाठी, ऑफिसच्या कामासाठी, अन्य कामासाठी बाहेर गावी गेलेले अनेकजण अडकून पडले. लॉकडाऊनच्या काळात घरी परत येण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने अनेकांचे हाल झाले.

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची परवानगीची अट घालण्यात आली. त्यामुळे बाहेर अडकून पडलेल्यांना घरी पोचण्याची आशा पल्लवीत झाली. परंतु त्यांच्या या आशेवर आता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी पाणी फिरविण्याचे काम सुरू केले आहे. 

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर

शिवणे येथील एका कुटुंबाची ही गोष्ट. वास्तविक पोलिस परवानगी आणि कोरोना विषाणूंची तपासणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र असताना देखील सोसायटीतील पदाधिकारी मात्र ऐकण्यास तयार नाहीत. उलट पोलिसांकडे तक्रार करू, अशी धमकी सोसायटीचे पदाधिकारी देत आहे. अशा प्रकारातून अनेक सोसायट्यांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत.

कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...

कशीबशी सोसायटीधारकांनी समजूत काढून घरी आले, तर चौदा दिवस घराबाहेर पडायचे नाही, असे बंधन सोसायटीकडून घातले जाते. सोसायट्यातील पदाधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी 'सकाळ'कडे आल्या आहेत.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police and Administration gave permission but the society has barred entry to Family in Pune