महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

थकीत वीजबिल न भरल्यामुळे वीजजोड तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्राहकाने धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्राहकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 

पुणे - थकीत वीजबिल न भरल्यामुळे वीजजोड तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्राहकाने धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्राहकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 

देवेश गणपत आल्हाट (वय 45, रा. न. ता. वाडी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संध्या पाटील (वय 28, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पाटील या महावितरणच्या सहायक अभियंता आहेत. आल्हाट यांनी फेब्रुवारी 2019 पासूनचे वीजबिल भरले नव्हते. त्यांच्याकडे बिल थकल्यामुळे वीजजोड तोडण्यात येणार असल्याची पूर्वसूचना महावितरणने आल्हाट यांना दिली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी फिर्यादी या त्यांचे कार्यालयीन कर्मचारी लखन राम आरे आदींसह आल्हाट यांच्या घरी गेल्या. त्यांनी वीजजोड तोडली. त्यामुळे आल्हाट याने फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest customer for obstructing government work

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: