पुण्यात मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

णे : रस्त्याने पायी जाणाऱ्यांचे मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यासह दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अभिषेक भरत लेकवले, अभिषेक बलभीम साळुंके (दोघे रा. आंबेगाव, कात्रज) या दोघांना अटक केली आहे.
 

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्यांचे मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यासह दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अभिषेक भरत लेकवले, अभिषेक बलभीम साळुंके (दोघे रा. आंबेगाव, कात्रज) या दोघांना अटक केली आहे.

भारती विद्यापीठ, डेक्कन, वारजे, अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोबाईल हिसकावण्याच्या घटना घडत होत्या. या दृष्टीने अलंकार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे व पोलिस शिपाई धनवटे यांना अभिषेक लेकवले याचे नाव कळाले. त्यानुसार त्यांनी त्याचा शोध सुरू केला.

लेकवले हा घरी असल्याचे कळताच अलंकार पोलिसांच्या पथकाने त्याला घरातून ताब्यात घेतले. घराच्या झडतीमध्ये सात मोबाईल सापडले. त्याचा मित्र अभिषेक साळुंके याच्या मदतीने गुन्हे वारजे, डेक्कन, भारती विद्यापीठ, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सात मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 1 लाख 35 हजाराचा ऐवज जप्त केला. 

लेकवाले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अलंकार, सिंहगड, बारामती पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest two mobile thieves in Pune