पुणे : लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

वाघोली (ता. हवेली) येथील रिलायन्स मार्ट या दुकानासमोर उभ्या असलेल्या विशाल निळकंठ भारती या इसमास चाकूचा धाक दाखवून चौदा दिवसांपूर्वी लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी मांजरी बुद्रुक येथून ताब्यात घेतले आहे.

लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथील रिलायन्स मार्ट या दुकानासमोर उभ्या असलेल्या विशाल निळकंठ भारती या इसमास चाकूचा धाक दाखवून चौदा दिवसांपूर्वी लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी मांजरी बुद्रुक येथून ताब्यात घेतले आहे.

राजेश सीताराम देवकर (वय २५, रा. गोपाळपट्टी मांजरी बुद्रुक, ता. हवेली) व विशाल भारत पाटोळे (वय १८,रा.शिवाजी चौक मांजरी बुद्रुक) ही ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे असून, वरील दोघांच्यावर विशाल भारती यास लुटल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख,पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार , वाघोली येथील रिलायन्स मार्ट या दुकानासमोर ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी विशाल भारती उभे असताना राजेश सीताराम देवकर व विशाल भारत पाटोळे या दोघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व भारती यांच्या जवळील रोख रक्कम जबरीने लुटली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहेती मिळताच त्यांनी वरील दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी खबरे कामाला लावले होते. खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश सीताराम देवकर व विशाल भारत पाटोळे बुधवारी रात्री उशीरा मांजरी बुद्रुक हद्दीतील शिवाजी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पाेलिसांनी सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेतले.  राजेश देवकर व विशाल पाटोळे या दोघांच्यावर लोणीकंदसह पुणे शहर पोलिसांत लुटमारीचे आणखी गुन्हे दाखल असून पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest two robber in manjri