गाढव चोरणाऱ्या चोरट्यांचा डाव पोलिसांनी उधळला; एकास अटक

donkey.jpg
donkey.jpg

बारामती शहर : गाढवांची चोरी करणाऱ्या एकास बारामती शहर पोलिसांनी पाठलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळ पकडले. बारामतीतील पानगल्लीमधून पंधरा गाढवांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना आंध्रप्रदेशात चोरुन नेण्याचा चोरट्यांचा डाव होता. 

बारामती शहर पोलिस ठाण्याची रात्रपाळीची गस्तीची गाडी पानगल्लीतून चालली असताना त्यांना या गाडीचा संशय आला तेव्हा, पोलिसांनी त्यांना हटकले, त्यांनी थेट गाडी सुरु करुन ती पुढे दामटली. गाडी वेगाने निघाल्यानंतर बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मानसिंग खोचे यांच्या सूचनेनुसार फौजदार योगेश शेलार व  सतीश अस्वर, पोलीस कर्मचारी नितीन जगताप, रुपेश साळुंखे, नूतन जाधव, अजित राऊत, तुषार सानप, पोपट नाळे, तुषार चव्हाण यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. 

फलटणजवळ या गाडीला थांबविण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. मात्र ती गाडी फलटणला न थांबता लोणंदच्या दिशेने गेली. पोलिसांनी शेवटपर्यंत सिनेस्टाईलने या आयशर टेम्पोचा पाठलाग केला. लोणंदजवळ या गाडीतील दोन जण उडया टाकून अंधाराचा फायदा घेत पळून गेले, मात्र एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 

संशयित आरोपी हा आंध्रप्रदेशचा असून त्याला मराठी भाषा येत नसल्याने त्याचे नाव गाव पत्ता समजला नसल्याचे फौजदार सतीश अस्वर यांनी सांगितले. सुमारे पंधरा गाढवे या टेम्पोमध्ये भरुन आंध्रप्रदेशाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरु होता. या संदर्भात या गाढवाच्या मालकांनी दुपारी बारामती शहरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदर टोळीचा पाठलाग करून दरम्यान ही पंधरा गाढवे पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच उभी करुन ठेवली होती, फिर्याद दिल्यानंतर संबंधित गाढवे, मालकांच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबत पकडलेल्या आरोपीकडे दुभाषी आल्यानंतर सखोल चौकशी होणार असून यात तस्करीचा प्रकार आहे की इतर अजून काही प्रकार या बाबत चौकशी केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com