एटीएम फोडण्याच्या तयारीतील टोळक्‍यास हडपसरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय 45, रा. भापकर वस्ती, मांजरी), गोगलसिंग बादलसिंग कल्याणी (वय 46, रा. कोठारी मील, रामटेकडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत; तर पैतर गब्बरसिंग टाक, तिलकसिंग गब्बरसिंग टाक, विकीसिंग जालिंदर कल्याणी (सर्व रा. रामटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पथक शनिवारी रात्रगस्त घालत होते, त्या वेळी रात्री साडेअकराच्या सुमारास एक कार हडपसरमधील माळवाडी येथे संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले तर तिघे पळून गेले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दोन बोअर कटर, 4 लोखंडी कटावण्या, लोखंडी सुरा, मिरची पावडर व एक कार असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. संबंधित आरोपी माळवाडी येथील एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Web Title: police arrested Gang leader in Hadapsar