गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे;पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे;पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

पुणे - विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत गुन्हेगारांना जामीन मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या पुणे पोलिसांनी आवळल्या. या प्रकरणात पोलिसांनी 24 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून 13 जणांना अटक केली आहे. 

निलेशकुमार नंदकुमार शहाणे (वय 27, दत्तवाडी), महारुद्र मोहन मंदरे (वय 26, माणिकबाग), असिफ ताहीर शेख (वय 27, कात्रज), मोहसीन बाबू सय्यद (वय 48, रा. निगडी), रशीद अब्दुल सय्यद (वय 49, रा. शांतिनगर), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय 44, चिंचवड) अशी एका गुन्ह्यात अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात नागेश माणिक बनसोडे (वय 39, पिंपरी) याला अटक केली आहे. अन्य एका गुन्ह्यात 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक केली नाही. कोंढव्यात भावेश विजय शिंदे (वय 33), विक्की विद्यासागर पुडगे (वय 28), कल्पेश सीताराम इंगोले (वय 18), सोनू अशोक जगधने (वय 29), शशांक प्रकाश साळवी (वय 31), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि पॉस्कोसारख्या गंभीर गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी आरोपी बोगस कागदपत्रे तयार करून शिवाजीनगर, लष्कर, वडगावसह विविध न्यायालयात सादर करीत होते. त्यासाठी काही टोळ्या कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

आधार, रेशन कार्डसह सातबाराही 
संबंधित टोळीकडून आधार कार्ड, रेशन कार्ड आणि सातबारा उतारे बनावट तयार करीत असत. बहुतांश आरोपी सराईत व घरफोडी, चोऱ्या करणारे होते. जामीन मिळाल्यानंतर ते कधीच न्यायालयात हजर होत नव्हते. आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकांनी कारवाई केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com