पोलिसांना शिवीगाळ करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - दुचाकीवरून जाताना आरडाओरडा केल्याचा जाब विचारल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी मार्केट यार्ड परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

संदीप मारुती लांडगे (वय 29, रा. गणेश बिल्डिंग, दुसरा मजला, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस कर्मचारी ए. के. गायकवाड यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लांडगे हा रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्त्यावरील महापालिकेच्या कार्यालयासमोरून दुचाकीवरून जात होता. त्या वेळी तो आरडाओरडा करत होता. त्यावरून गायकवाड यांनी त्याला जाब विचारला. त्या वेळी त्याने गायकवाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनाही शिवीगाळ केली. 

Web Title: Police arrested a man

टॅग्स