पोलिस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा करणाऱ्यास अटक

arrested
arrested

राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीच्या उत्तर पत्रिकेत घोटाला करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मागील वर्षी झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा केलेल्या मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संबंधित आरोपी पुण्यात त्याच्या वकीलांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्यास बेडया ठोकल्या.

प्रवीण दत्तात्रय भटकर (वय 34, रा.शिंदेनगर, बावधन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी भटकर याने अन्य आरोपीशी संगनमत करुन नियोजन पद्धतीने कट रचून लेखी परीक्षेस बसलेल्या मोजक्या उमेदवाराना मोजकेच प्रश्न सोडविण्याचे सांगून उत्तर बनावट उत्तर पत्रिका तयार करुन ती खरी असल्याचे भासवुन उमेदवारांना गुण वाढवून देत शासनाची फसवणुक केली. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला होता. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी भटकर हा पुण्यात त्याच्या वकिलांना भेटण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्यास सापळा रचून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com