कर्वेनगरमध्ये पिस्तूल घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police arrested minor boy  carrying pistol in Karvenagar pune

कर्वेनगरमध्ये पिस्तूल घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

पुणे : विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कर्वेनगर परिसरात शुक्रवारी (ता. २२) ही कारवाई केली. या संदर्भात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो पेरु बागेजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या नातेवाइकांना नोटीस देऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले आहे. या मुलाविरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल आहे.

Web Title: Police Arrested Minor Boy Carrying Pistol In Karvenagar Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top