पुण्यात पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

Police arrested the robbers in Pune
Police arrested the robbers in Pune

पुणे : वाघोली आणि विमाननगर परिसरात दरोडे टाकणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन गोडाऊन येथे 26 ऑक्टोबरला पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी पथके बनवून तपास सुरु केला. अखेर 14 दिवसांनी पोलिसांना दरोडेखोऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. सत्यवान उर्फ आप्पा गाडगे (रा. वाघेश्वरनगर, वाघोली), निशांत अनिल ननावरे (रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) आणि आकाश अशोक राठोड (रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांना जेरबंद केले.

या तिघांनी दरोडेखोरांकडून अन्य काही गुन्ह्यांची कबुली होण्याची शक्यता आहे. अन्य दोन साथीदारांच्या माध्यमातून त्यांनी हा गुन्हा केला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com