न्यायाधिशांचे घर फोडणारा चोरटा जेरबंद

संदीप जगदाळे | Wednesday, 3 October 2018

हडपसर : शिवीजीनगर न्यायालयातील न्यायधिशांच्या घरी घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5 चारचाकी, 3 दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच 21 घरफोडयासंह 10 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांनी वानवडी, लोणीकंद, चंदननगर या भागातून वाहनचोरी केली असून त्याचा वापर घरफोडीसाठी करण्यासाठी वापरली जात असल्याचे तपासात निषपन्न झाले आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्याययालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून काम करणाऱ्या न्याधिशांच्या घरी 55 हजार रूपयांची तर लोणीकंद येथे 65 हजार रूपयांची घरफोडी केली आहे. घरफोडीतून मिळालेले पैसे ते मौजमजेसाठी वापरत असत. गेल्या दहा महिन्यांपासून ते घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे करीत होते. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे, गुन्हे पोलिस निरिक्षक हमराज कुंभार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भांगे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, युसुफ पठाण, राजेश नवले यांच्या पथकाने केली.