विनापरवाना 39 फटाके विक्रेत्यांवर गुन्हे 

विनापरवाना 39 फटाके विक्रेत्यांवर गुन्हे 

पुणे : हडपसर परिसरात विनापरवाना अनधिकृतरीत्या फटाके दुकान चालविणाऱ्या 39 विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी या विक्रेत्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील फटाके जप्त करण्यात आले आहेत. 

हडपसर परिसरात काही विक्रेत्यांनी अनधिकृत फटाके स्टॉल लावले होते. त्यासाठी विक्रेत्यांनी महापालिका, पोलिस आणि अग्निशामक दलाकडून परवाना घेतला नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृत फटाका स्टॉलमुळे या भागातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता होती. याबाबत वरिष्ठ निरीक्षक सुनील तांबे यांनी तीन पथके तयार केली. या पथकातील 15 अधिकारी आणि 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले फटाके शिवाजीनगर येथील गोदामात ठेवण्यात आले आहेत. या 39 फटाके विक्रेत्यांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे तांबे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com