खेळणी विकणाऱ्या मुलांसोबत पोलिसांनी साजरी केली दिवाळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे : वाहतूक पोलिसांनी खेळणी विकणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या कुटुंबीयांसमवेतही पोलिसांनी आनंदोत्सव केला. कोंढव्यातील शिवाजी मैदानाच्या परिसरात हा अनोखा उत्सव पाहायला मिळाला. मूळचा दिल्लीचा राजू भाटी यांचे कुटुंब शिवाजी मैदानाच्या परिसरात एका झोपडीत वास्तव्याला आहे. परिसरात खेळणी विकून ते आपल्या 

कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र शहरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना भाटीच्या झोपडीमध्ये मात्र अंधार होता. त्याच्या दारांमध्ये ना आकाशकंदील होता, ना एखादी पंती होती. ही बाब येथील वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाटीच्या कुटुंबीयाला कपडे, दिवाळी फराळ, आकाशकंदील आणि पणत्या देत, त्याच्यासोबत दिवाळी साजरी केली. या अनपेक्षित प्रकाराने भाटी कुटुंबीय भारावून गेले. 

Web Title: Police celebrate Diwali with children selling toys

टॅग्स