पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी तपासली महिलांची ओळखपत्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून बुधवारी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. तेथील दीड हजार महिलांकडील ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली असून, त्यात सुमारे दीडशे महिला विना ओळखपत्र राहत असल्याचे आढळून आले. अशा महिलांना दोन दिवसांत ओळखपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम आणि उपायुक्‍त सुहास बावचे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. बुधवार पेठेतील या वस्तीमध्ये पोलिसांकडून गेल्या एक जानेवारीपासून विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

या वस्तीत राहणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तेथील महिलांकडील ओळखपत्र तपासण्यात येत आहेत. आज सायंकाळी चार ते सहा या कालावधीत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात दीडशे महिलांकडे ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. त्या महिलांना दोन दिवसांत आधारकार्ड किंवा ओळखपत्र न दिल्यास या वस्तीत थांबू नये, असे सांगण्यात आले आहे. या वस्तीत एखाद्या महिलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. याबाबत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलांना स्पष्ट बजावण्यात आले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक के. एन. नावंदे यांनी सांगितले.

पोलिसांकडून दररोज नाकाबंदी
बुधवार पेठेतील या वस्तीमध्ये दररोज रात्री 11 ते पहाटे तीन या वेळेत नाकाबंदी करण्यात येणार आहे. नाकाबंदीच्या वेळी तेथे येणाऱ्या नागरिकांवर खटले भरण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police Combing Operation in Budhwar Peth Prostitution