पोलिस आयुक्तालय कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पिंपरी - बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुधवारी (ता. १५) कार्यान्वित झाले. या वेळी ऑटो क्‍लस्टर येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले.

खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण जाधव, स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, पोलिस आयुक्त के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय कार्यान्वित झाल्याने आजचा दिवस शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे. यापुढील काळात आयुक्‍तालयाचे रीतसर उद्‌घाटन होईल. पोलिस आयुक्‍तालयाबाबत आम्ही शहरवासीयांना दिलेला शब्द पाळला.

औद्योगिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवडचे नाव आशिया खंडात आहे. हेच नाव पोलिस आणखीन उज्ज्वल करतील. सामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू असून, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. कार्यालय सुरू करताना काही त्रुटी असून, भविष्यात त्या दूर केल्या जातील. आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध आहे. सर्व सोयीसुविधा आगामी काळात देण्यात येईल.’’ पोलिस आयुक्‍त पद्मनाभन म्हणाले, ‘‘लोकांच्या भावना लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवितात. त्यांचा सन्मान राखला जाईल.

मात्र कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. जनतेची सेवा म्हणून आम्ही आगामी काळात काम करू. आम्ही काय करणार आहोत हे सांगण्यापेक्षा कृतीतून नागरिकांना दाखवून देऊ. आम्ही ‘फोन अ फ्रेंड’ हा नवीन उपक्रम सुरू करणार आहोत. नागरिकांनी फोन केल्यास पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोलिस पोचतील. याबाबत मी स्वतः चाचणी घेणार आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नागरिकांनी नियमभंग करणाऱ्या वाहनांचा फोटो काढून पाठविल्यास त्यावर कारवाई केली जाईल. यासाठी एक क्रमांकही देणार आहोत.’’

महत्त्वाचे संपर्क क्रमांक - पोलिआयुक्त आर. के. पद्मनाभन - २७४५०४४४, २७४५०५५५; अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे - २७४५०१२५; पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक व दोन) - २७४८७७७७; नियंत्रण कक्ष - २७४५०१२१, २७४५०१२२, २७४५०६६६, २७४५०८८८, २७४५८९००, २७४५८९०१.

Web Title: Police Commissionerate in Pimpri Chinchwad