खंडणी मागितल्यावरून गवळीटोळीच्या विरोधात गुन्हा

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मंचर (पुणे) : लोणी (ता. आंबेगाव) येथील सरकारमान्य ताडी दुकानदाराकडून 40 हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गवळी टोळीतील दोन जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री (ता. 26) गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या आठ दिवसात गवळी टोळीच्या विरोधात खंडणी मागितल्याचा हा तिसरा गुन्हा आहे.

मोबीन मेहमूद मुजावर (वय 28, रा. वडगावपीर, ता. आंबेगाव, सध्या रा. दगडीचाळ भायखळा मुंबई), सूरज राजेश यादव (वय 20, रा. लोणी, ता. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापूर्वी लोणी येथील कापड व ड्रायफूडचे व्यापारी व लोणीच्या सरपंचाकडून आरोपींनी प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली होती. या दोन्ही गुन्ह्यात अटक झाल्यामुळे आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. लोणी येथे झालेल्या ग्रामसभेत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी व्यापारी व नागिरकांना धीर देत पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ताडी विक्रेत्याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

वडगाव पीरची 11 मार्च रोजी यात्रा होती. यात्रा झाल्यानंतर ताडी दुकानदाराकडे सूरज यादव व मोबीन मुजावर यांनी 40 हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर दोन वेळा दुकानात जाऊन पैसे दिले नाही तर दुकानाची तोडफोड करू अशी धमकी दिली. घाबरून दुकानदाराने ता. 24 मार्च रोजी रात्री यादव व मुजावर यांना तीस हजार रुपये रोख दिले. या संदर्भात ताडी दुकानदाराने आरोपींच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: police complaint register against gawali gang