सावकारीप्रकरणी शिक्रापूरला दोघांवर गुन्हा

भरत पचंगे
शनिवार, 12 मे 2018

कान्हूर मेसाईचा ग्रामविकास अधिकारी फरारी; एकाला पोलिस कोठडी

शिक्रापूर: बेकायदा सावकारी करणाऱ्या कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ मुकुट गवारे (वय 40, रा. विठ्ठलवाडी, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली असून, ग्रामविकास अधिकारी गंगाराम शेलार हा फरारी झाला आहे. गवारे याला शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्याला 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गवारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकाश किसन मांढरे (वय 40, रा. शिक्रापूर) व त्यांची पत्नी रोहिणी मांढरे (वय 36) हे आठ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्याकडे गवारेविरोधात लेखी पुरावा नसला, तरी त्यांच्यासोबत झालेले मोबाईल संभाषण उपलब्ध आहे. त्या आधारे बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवारे याने 6 लाख 10 हजारांच्या रकमेवर 5 टक्के व्याज लावून मूळ मालमत्तेचे खरेदीखत पालटून देण्यासाठी 19 लाखांची मागणी करून मांढरे कुटुंबाला त्रास देणे सुरू केले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून मांढरे दांपत्य उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी गवारेला अटक केली.

दुसऱ्या प्रकरणात, सणसवाडी येथील वाहतूक व्यावसायिक चंद्रकांत लिंबराज गंभिरे (वय 28, रा. सणसवाडी, ता. शिरूर) हे घर विकण्यासाठी आठ अ चा उतारा आणण्यासाठी सणसवाडी ग्रामपंचायतीत गेले असता त्यांना उतारा न देता शेलारने त्यांना व्याजाने रक्कम दिली. नंतर पाच व दहा टक्के व्याज आकारून वसुलीचा तगादा लावला. शेलारने जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी गंभिरे यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. मूळ रक्कम व एक लाख रुपये व्याजापोटी देऊनही आणखी 74 हजार रुपये मागणाऱ्या शेलारच्या विरोधात पोलिसांनी बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल केला. तो फरारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: police complaint register against moneylender in shikrapur