पोलिसांनी केली विद्यार्थ्यांसह योग साधना

प्रफुल्ल भंडारी 
शुक्रवार, 22 जून 2018

दौंड (पुणे) :  नानवीज (ता. दौंड) राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्रातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसमवेत योग साधना केली. दौंड शहर व परिसरात देखील विविध उपक्रमांनी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

दौंड (पुणे) :  नानवीज (ता. दौंड) राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्रातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसमवेत योग साधना केली. दौंड शहर व परिसरात देखील विविध उपक्रमांनी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

 नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर गुरूवारी (ता. २१) योग दिनानिमित्त प्राचार्य नीलेश अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य कैलास न्यायनीत व श्री. उत्तेकर यांनी विशेष सत्राचे संयोजन केले होते. केंद्रातील २६८ पोलिस अधिकारी व कर्मचारी या सत्रात सहभागी झाले होते. तसेच भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (वायरलेस फाटा) व नामदेवराव पासलकर माध्यमिक विद्यालय (नानवीज) येथील मुख्याध्यापक श्री.कुलाळ आणि श्री.वाघमोडे सर यांच्यासह विद्यालयातील एकूण २२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक शिवराम जठार यांनी कवायत मैदानावर उपस्थितांना योगांविषयी माहिती देत प्रात्यक्षिके करून घेतली. ध्यान, प्राणायाम , ताडासन, कपालभाती, वृक्षासन, भद्रासन, आदी आसने करण्यात आली. 

दौंड मेडीकल असोसिएशनच्या वतीने शहरातील वर्षा गार्डन येथे योगासनांचा विशेष वर्ग घेण्यात आला. असोसिएशनच्या अध्यक्षा तथा योग प्रशिक्षिका डॅा. सुनीता कटारिया यांच्यासह त्यांच्या शिष्या सलमा शेख व शलाका घोडके यांनी प्राणायाम, वक्रासन, भुजंगासन, कपालभाती, आदी आसने सादर करून उपस्थितांकडून ती करून घेतली. योग करताना घ्यावयाची काळजी आणि मानेच्या, कंबरेच्या व पायांच्या हालचालींविषयी या वेळी माहिती देण्यात आली. शहरातील डॅाक्टरांसह नागरिक या वर्गात सहभागी झाले होते.          

शहरातील दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने योग दिनाचे संयोजन करण्यात आले होते. डॅा. प्रा. संजय इंगळे, डॅा. प्रा. पी. आर. बीडकर, प्रा. सुनील वाघ, डॅा. प्रा. भास्कर जंगले, प्रा. जांभुळकर, प्रा. अभिजीत येडे, प्रा. महेश माने, आदी या वेळी उपस्थित होते. शिवराम जठार व भागाभाऊ भिकूजी गाढवे यांनी विद्यार्थ्यासमोर विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर करण्यासह संतुलित आहार, नियमित व्यायाम, आदर्श जीवनशैली, निरोगी शरीर, आदींविषयी उपयुक्त माहिती दिली. 

शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालय, भीमथडी शिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, लिंगाळी (ता. दौंड) येथील श्रीमंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, आदी विद्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. रेल्वे कामगार मैदान येथे पतंजली योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

Web Title: Police conducted yoga sessions with students