शिवसेना, राष्ट्रवादीत राडा; ५ जणांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पिंपरी - पिंपरी कॅम्पमध्ये सोमवारी (ता. २१) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी प्राणघातक हल्ल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, पिंपरी पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी, महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकर यांच्यासह दोन्ही गटांतील पाच जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना रविवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी सोनकर याच्या मोटारीतून दोन पिस्तूल व अकरा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 

अभिनवकुमार सुरेंद्रकुमार सिंह यांच्या फिर्यादीनुसार आसवानी (रा. पिंपरी) व प्रशांत मंदू यांना अटक केली असून, तीन साथीदार फरार आहेत; तर आसवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बबलू ऊर्फ धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी), जितू मंगतानी आणि लच्छू बुलानी यांना अटक केली, तर अरुण टाक, दीपक टाक, मोहित बुलानी, अनिल पारछा तसेच सोनकर याचे तीन अंगरक्षक व इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरारी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल, अकरा जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली. सोमवारी दुपारी आरोपी हे बेकायदा जमाव जमवून आसवानी यांच्या घराजवळ आले. त्या वेळी अरुण टाक, दीपक टाक यांनी आसवानी यांना घेरले. सोनकरने त्यांच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. तसेच मंगतानी याने धमकी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody for 5 persons in pimpri