वाहतूक शिस्तीला अधिकारी बदलाचा अडसर

वाहतूक शिस्तीला अधिकारी बदलाचा अडसर

पुणे - शहरातील वाहतुकीची समस्या कायम असताना याबाबतच्या नियोजनाची प्रमुख जबाबदारी असणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांची सातत्याने बदली केली जात आहे. ही बाब वाहतुकीच्या प्रश्‍नातील प्रमुख अडथळा ठरत आहे. मागील तीन वर्षांत वाहतूक शाखेत पाच पोलिस उपायुक्त झाले असून, दर सहा-सात महिन्यांतच या अधिकाऱ्यांची बदली केली जात आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा पोलिस अधीक्षकपदी नुकतीच बदली केली; तर साताऱ्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. शहराच्या वाहतूक शाखेत २००८ ते २०१६ या कालावधीत मनोज पाटील, विश्‍वास पांढरे व सारंग आवाड या तीन पोलिस उपायुक्तांना काम करण्याची संधी मिळाल्याने शहरात वाहतुकीचे वैविध्यपूर्ण प्रयोग राबविणे शक्‍य झाले; परंतु २०१६पासून आतापर्यंतच्या तीन वर्षांत वाहतूक शाखेत पाच पोलिस उपायुक्त झाले. त्यामध्ये डॉ. प्रवीण मुंढे यांना २०१६-१७मध्ये आठ महिने आणि त्यानंतर पुन्हा दोन महिने काम करण्याची संधी मिळाली.  

त्यांच्यानंतर कल्पना बारावकर यांनी तीन महिने काम पाहिले. त्यानंतर आलेल्या अशोक मोराळे यांनी १६ महिन्यांत ‘ब्लॅक स्पॉट’ची निवड, त्यावरील उपाययोजना व ई-चालनासारख्ये उपक्रम राबविले. त्यांच्यानंतर आलेल्या तेजस्वी सातपुते यांनी सात महिन्यांत पुणेकरांशी सुसंवाद, हेल्मेटचा वापर आणि अपघातातील मृत्यू रोखण्यापासून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र दर सहा-सात महिन्यांनी अधिकाऱ्यांची बदली होण्याच्या प्रकारामुळे वाहतुकीची समस्या सुटणे तर दूरच; उलट नियोजनात सातत्य राखण्यासही मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे.

कमी कालावधीमुळे मर्यादा
‘आयपीएस’ अधिकारी मोठ्या शहरांमध्ये किंवा पोलिस दलातील महत्त्वाच्या शाखांमध्ये काम करण्यासाठी कायम उत्सुक असतात. अशा अधिकाऱ्यांची एक वर्षाच्या आतच बदली होत असल्याने वाहतूक शाखेला ‘आयपीएस’ दर्जाचे अधिकारी मिळूनही त्यांना काम करण्यासाठी पुरेसा कालावधीच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा वाहतूक सुधारणेसाठी पूर्णपणे वापर होत नसल्याचेही वास्तव आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com