पिंपरी : पोलिसाने केला महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार 

Police did sexual assault to Women Police in pimpri
Police did sexual assault to Women Police in pimpri

पिंपरी : वडील व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. 

शुभम गजानन मोहिते असे अटक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम हा पुण्यातील मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत आहेत. शुभम याने फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यास महिलेने नकार दिला असता त्याने महिलेच्या वडीलांना व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता आरोपीने त्यास नकार दिला. तसेच याबाबत तक्रार केल्यास महिलेचे वडील व बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याचीही धमकी दिली.

दरम्यान, याबाबत महिलेने आरोपीची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी महिलेस वाईट वागणूक दिली. यासह आरोपीने फिर्यादी महिलेशी जातीवाचक संभाषण केल्याने आरोपीवर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com