पोलिसांनी दिलं सौभाग्याचं लेणं 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले... पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सव्वा महिन्यात दागिने परत मिळवून दिले... काल सोमवारी लग्नाचा 50वा वाढदिवस होता... पोलिसांनी माझ्या सौभाग्याचं लेणं मिळवून देत जणू भेटच दिली... अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिक विजया कुलकर्णी यांनी आपली भावना व्यक्‍त केली. तर दीक्षित म्हणाल्या, "नवरात्रीच्या दिवशी चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावून नेले होते.

पुणे - चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले... पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सव्वा महिन्यात दागिने परत मिळवून दिले... काल सोमवारी लग्नाचा 50वा वाढदिवस होता... पोलिसांनी माझ्या सौभाग्याचं लेणं मिळवून देत जणू भेटच दिली... अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिक विजया कुलकर्णी यांनी आपली भावना व्यक्‍त केली. तर दीक्षित म्हणाल्या, "नवरात्रीच्या दिवशी चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावून नेले होते. ते दागिने परत मिळतील, याची मी आशाच सोडून दिली होती...परंतु पोलिसांनी दागिने मिळवून देत मला भाऊबिजेची भेट दिली.' अशा एक-दोन नव्हे तर 35 महिला-पुरुषांचे चोरीस गेलेले दागिने पुणे पोलिसांनी पुन्हा परत मिळवून दिले. 

शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या विविध गुन्ह्यांतील चोरट्यांना अटक करून दागिने जप्त केले. त्यापैकी 35 तक्रारदार नागरिकांना तीन किलो 426 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेतीन किलोहून अधिक चांदीचे दागिने असा सुमारे 91 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात मंगळवारी दागिने पुन:प्रदान कार्यक्रमात पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला. या वेळी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सहआयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, शशिकांत शिंदे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले; तर पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: The police gave jewellery